महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik : अंडरवर्ल्डशी संबंध प्रकरणी ईडीने सादर केली 1989 ची तक्रार

मुंबईतील जमिनीच्या व्यवहारावरून मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांचा डॉन दाऊद इब्राहिम गँगशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत ( Daud Ibrahim Money Laundering Case ) आहे. याप्रकरणी ईडीने १९८९ साली दाखल करण्यात आलेली एक तक्रार न्यायालयात सादर केली आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Feb 24, 2022, 5:51 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक व विकास मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत करण्यात आली आहे. मनी लाँडरिंगशी संबंधित प्रकरण ( Daud Ibrahim Money Laundering Case ) आहे. ईडीने या प्रकरणी 1989 ची तक्रार सादर केली आहे. मुंबईतल्या कुर्ला भागात असलेली एक प्रमुख मालमत्ता हडप करण्यासाठी अंडरवर्ल्डशी व्यवहार केल्याचा मलिक यांच्यावर ईडीने आरोप केला आहे. ईडीने रिमांड कॉपीमध्ये म्हटले आहे की, तक्रारदार मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेला समजले की, तिची 3 एकर वडिलोपार्जित मालमत्ता नवाब मलिक यांनी हडप केली आहे असे ईडीने म्हटले आहे.

सर्व व्यवहारांसाठी तोतया भाडेकरू

या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. याप्रकरणी ईडीने खानचा जबाबही नोंदवला आहे. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील पॉवर ऑप अ‍ॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका झाल्या. त्यावेळी आपणही उपस्थित असल्याचा दावा यावेळी खानने त्याच्या जबाबात केला. या जागेवर मलिक यांचे दुकानही होते असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत खरेदी खतानुसार तीन कोटी 30 लाख रुपये होती. त्यातील केवळ 15 लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आले. या सर्व व्यवहारासाठी तोतया भाडेकरू उभे करण्यात आले, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार

दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ईडीने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ईडीने बुधवारी ही कारवाई केली.

काल केली आहे अटक

मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही त्यांच्याबरोबर होते. या कारवाईबाबतची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करायची असल्याचे सांगून ईडी अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. मलिक यांनी काही वेळ मागून घेतला. त्यानंतर ते ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमीर हे त्यांच्याबरोबर होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना 'ईडी'च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.

धमकावून बळकावल्या मालमत्ता

ईडीने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा दावा ईडीने 14 दिवसांची कोठडी मागताना केला. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.

..त्याबाबत माहितीच नाही

मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर 1970 मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाट्याला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर 2015 मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकट्या वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ईडीला जबाबात सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details