महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CoronaVirus : मुंबईत 198 कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 आयसीयूमध्ये, - मुंबई कोरोना व्हायरस

मुंबईत कोरोनाचे 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत एकीकडे कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नसताना पालिकेने रुग्णालयातील रुग्णांची काहीशी चिंता वाढवणारी आकडेवारी जाहीर केली आहे.

corona patients are on ventilator
मुंबईत 198 कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर

By

Published : May 24, 2020, 8:30 AM IST

मुंबई -मुंबई शहर व उपनगरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाचे 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत एकीकडे कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नसताना पालिकेने रुग्णालयातील रुग्णांची काहीशी चिंता वाढवणारी आकडेवारी जाहीर केली आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचे 28634 एकूण रुग्ण असून त्यापैकी 949 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 7476 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 22 मे रोजी मुंबईत सध्या 5392 रुग्ण अॅडमिट होते. त्यापैकी पालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात 4056 तर खासगी रुग्णालयात 1336 रुग्ण अॅडमिट होते. त्यामधील 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत तर 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोना केअर सेंटर 2 मध्ये 3658 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना केअर सेंटर 1 मध्ये अति जोखमीचे 15607 रुग्ण भरती आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना -
कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईत झोपडपट्टी आणि चाळीत 659 कंटेंनमेंट झोन आहेत, तर 2411 इमारतीमधील काही भाग तर काही इमारती पूर्णपणे सीलबंद आहेत. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या 7395, कमी जोखमीच्या 15686 लोकांचा शोध घेण्यात आला आहे. कोरोना केअर सेंटर 1 मध्ये अति जोखमीचे 15607 रुग्ण भरती आहेत.

कोरोना चाचण्या -
मुंबईमधील 7 सरकारी व पालिकेच्या 7 तसेच 13 खासगी लॅबमध्ये 22 मे पर्यंत 164671 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत गेल्या 24 तासात 374 तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती, त्यात 22084 रुग्णांना तपासण्यात आले. 5452 नमुने कोरोना टेस्टसाठी घेण्यात आले. त्यात 392 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details