महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पाकिस्तानबरोबरील युद्धात शौर्य गाजविणारेे 'वीर' परवेझ जामास्जी यांचे निधन - 1971 war hero

परवेज जामास्जी हे पाकिस्तानसमवेतच्या युद्धात जखमी झाले होते. त्यामुळे चालताना त्यांना काठीचा आधार घ्यावा लागत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. हवाई दलाचे हे माजी अधिकारी दादरच्या पारशी कॉलनीत राहत होते.

परवेज जामास्जी
परवेज जामास्जी

By

Published : Jun 26, 2020, 2:40 PM IST

मुंबई- भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या 1971च्या युद्धात पराक्रम गाजविणारे स्क्वाड्रन लीडर परवेज जामास्जी यांचे निधन झाले. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिले. ते 77 वर्षांचे होते. युद्धातील शौर्याबद्दल त्यांना 'वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

परवेज जामास्जी हे पाकिस्तानसमवेतच्या युद्धात जखमी झाले होते. त्यामुळे चालताना त्यांना काठीचा आधार घ्यावा लागत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. हवाई दलाचे हे माजी अधिकारी दादरच्या पारशी कॉलनीत राहत होते. अल्पशा आजाराने त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.

त्यांना दिलेल्या वीरचक्राच्या सन्मानात म्हटले, की डिसेंबर 1971मध्ये पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू असताना फ्लाईट लेफ्टनंट परवेज रुस्तम जामास्जी हे हेलिकॉप्टर चालवित होते. त्यांच्या हेलिकॉप्टवर दोनदा मशीनगनने व दोनदा मोर्टारने हल्ला झाला होता. यावेळी ते प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर घेऊन तळावर परतले होते. एकवेळ इंजिन बंद पडले असताना हेलिकॉप्टर शत्रूच्या निशाण्यावर आले. मात्र, ते सुरक्षितपणे आपल्या प्रदेशात परतले. यामधून फ्लाईट लेफ्टनंट परवेज रुस्तम जामस्जी यांनी शौर्याचे प्रदर्शन, व्यावसायिक कौशल्य आणि कर्तव्यावरील श्रेष्ठ अशी निष्ठा दाखविली आहे.

परवेज जामास्जी वैमानिक म्हणून 1965 मध्ये हवाईदलात रुजू झाल होते. तर 1985 ला सेवानिवृत्त झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details