महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवी मुंबईत आज आढळले १९५ रुग्ण...आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा - Maharashtra corona update

सद्यस्थितीत कोरोनाच्या रूग्णांसाठी रुग्णालयेदेखील कमी पडत आहे. त्यामुळे वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये ११०० बेडचे तात्पुरते कोविड रूग्णालय उभारण्यात आले आहे.

New mumbai
नवी मुंबईत आज नवीन १९५ रुग्णांची वाढ

By

Published : Jun 11, 2020, 6:59 PM IST

नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतचं आहे. आज एका दिवसात नव्या १९५ कोरोनाग्रस्त रुग्णांची मुंबईमध्ये वाढ झाली असून, आजपर्यंतचा हा सर्वाधिक रुग्ण सापडल्याचा आकडा आहे. आज ८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आज ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांची नवी मुंबईत झपाट्याने होत असलेली वाढ प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली असून, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या मात्र कमी होत असल्याचे चित्र शहरात आहे. वाढते रूग्ण रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात फारसे यश येत नसल्यानेचेही दिसून येत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या रूग्णांसाठी रुग्णालयेदेखील कमी पडत आहे. त्यामुळे वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये ११०० बेडचे तात्पुरते कोविड रूग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय उपचारासाठी खुले केले जाईल याची प्रतीक्षा सर्व स्तरात होती, ती प्रतिक्षा आता संपली असून आजपासून हे रुग्णालय खुले करण्यात आले आहे.

शहरात आत्तापर्यंत ३ हजार ४२५ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून पैकी ११ जण इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत १४ हजार २७३ जणांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १० हजार ४१६ जण निगेटीव्ह आले असून, ४४३ जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार ४१४ इतकी आहे. आज १९५ जण (१०जून ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे मधील ३०, बेलापूर मधील १२, कोपरखैरणे मधील ३७, नेरुळ मधील ७ व वाशी २२, घणसोली ४२, ऐरोली मधील ३५, दिघ्यातील १० असे एकूण १९५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ८१ स्त्रिया व ११४ पुरुषांचा समावेश आहे. शहरात ३ हजार ४१४ इतका कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत १ हजार ९९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर आज बेलापूर मधील १५, नेरूळ मधील १२, वाशी मधील १, तुर्भे मधील ९, कोपरखैरणे मधील ३, घणसोली मधील २१, ऐरोली मधील १८, दिघा ४ अशा एकूण ८३ व्यक्ती आज कोरोना मुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये २५ स्त्रिया आणि ५८ पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये १ हजार ३०९ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details