महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमलीपदार्थ तस्कराला अटक करत 2 लाख 50 हजारांची रोकड जप्त

आयान सीन्हा या आरोपीला दोन लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सदरचा हा आरोपी मुंबईतील बांद्रा, खार, अंधेरी परिसरामध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

ncb arrested drug smuggler
ncb arrested drug smuggler

By

Published : Mar 24, 2021, 5:13 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईत एका 19 वर्षाच्या अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली असून आयान सीन्हा या आरोपीला दोन लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सदरचा हा आरोपी मुंबईतील बांद्रा, खार, अंधेरी परिसरामध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे.

पाळीव श्वानाकडून अटकाव

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस एनसीबीचे अधिकारी ही कारवाई करण्यासाठी घटनास्थळावर गेले होते, त्यावेळेस आरोपीच्या पाळीव श्वानाकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी अटकाव केला जात होता. बांद्रा येथील आरोपीच्या घरी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी धाड मारली असता त्या ठिकाणी त्यांना 2 लाख रुपयांचे अमलीपदार्थ आढळून आले आहे. या बरोबरच आरोपीकडून तब्बल 2 लाख 50 हजारांची रोकडसुद्धा जप्त करण्यात आली आहे.

सीपीयूमध्ये लपविले पदार्थ

या 19 वर्षाच्या आरोपीने त्याच्या घरातील संगणकाच्या सीपीयूमध्ये सदरचे अमली पदार्थ लपविले होते. या बरोबरच एक मोबाइल फोन, संगणक व काही इलेक्ट्रॉनिक वस्तू एनसीबीने आरोपीच्या घरातून हस्तगत केल्या आहेत. न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता त्याची रवानगी 27 मार्चपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details