महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जन आशीर्वाद यात्रा : मुंबईत वेगवेगळ्याठिकाणी 19 गुन्हे दाखल - Union Minister Narayan Rane

भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे विरोधात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 19 गुन्हे दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून सुरू झाली आहे. मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपानं जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत 8 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झालेत.

जन आशीर्वाद यात्रा
जन आशीर्वाद यात्रा

By

Published : Aug 20, 2021, 12:16 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे विरोधात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 19 गुन्हे दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून सुरू झाली आहे. मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपानं जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत 8 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झालेत.

या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद -

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, सायन गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.आतापर्यंत 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याआधीही झालीय कारवाई -

याआधी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेत देखील आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानपाडा, कल्याणमधील खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. भाजप जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल केले आहेत.

परवानगी नसताना यात्रा

मुंबई जन आशीर्वाद यात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही भाजपकडून या यात्रेचे आयोजन करण्यात आले. आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी उसळली त्या ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता होती त्यामुळे पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details