मुंबई -सहा हजार कोटीपेक्षा जास्त तोटा असलेल्या एसटी महामंडळाला यंदाच्या अर्थसंकल्पात 1 हजार 400 कोटींचा डोस देण्यात आलेला आहे. मात्र, ही निधी अपुरी असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाला अनेक अडचणीला समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन बस खरेदीसाठी भरीव तरतूद करणे अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया एसटी कामगार संघटनेकडून व्यक्त केली आहे.
5 हजार कोटी अपेक्षित-
कोरोना काळात एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. सध्या एसटी महामंडळाचे चाक पूर्वपदावर आले असले तरी प्रवासी नसल्यामुळे दररोज एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. सध्या एसटी महामंडळात 18 हजार 500 बसेसचा ताफा असून यातून 4 हजार बसेस नादुरुस्त आहे. त्याला दुरुस्त करून चालविण्यासाठी महमंडळाला मोठा खर्च आहे. परिणामी त्याऐवजी नवीन बसेसची खरेदी करने अपेक्षित आहे. त्यांच्याकरिता जवळजवळ 5 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करणे अपेक्षित होते. फक्त 1 हजार रुपयांची तरतूद पुरेशी नाही. एसटी महमंडळाला नवीन बसेस खरेदी केल्या तर प्रवासी संख्या वाढेल आणि महसुलात वाढ होईल, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी ईटीव्ही भारताला दिली आहे.
मदत करणे आवश्यक-
गुजरात राज्यातील एसटी महामंडळ महाराष्ट्रातील एसटी महामंडळ पेक्षा लहान आहे. तरीसुद्धा गुजरात राज्य सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद फक्त नवीन बस खरेदीसाठी केली जाते. त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळाकडून फार कमी तरतूद केली जात असल्याने अनेकदा सरकारकडे पैसे मागण्याची पाळी येते. कोरोनामुळे एसटी महमंडळाच्या संचित तोटा 6 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. प्रति दिवस 22 कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्या एसटी महामंडळाचे आज प्रति दिवस उत्पन्न 10 कोटी 40 लाखापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे एसटीचे प्रवासी वाढविण्यासाठी नवीन बसेसची आवश्यकता आहे. नवीन बसेस आल्याने प्रवासी संख्या वाढेल आणि एसटी महामंडळाच्या महसूल भर पडले. त्यामुळें शासनाने बस खरेदीसाठी मदत करणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
हेही वाचा -छोट्या गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे उच्च न्यायालयाचे एनएसईएलला आदेश
नव्या बसेससाठी 1 हजार कोटी-