मुंबई -मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या पायाभूत कामासाठी रविवारी, (ता. 19) रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी, (ता.20) रोजी रात्री 2 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लाॅक ( Central Railway Mega Block ) असणार आहे. परिणामी, उपनगरीय रेल्वेवर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात (Central Railway Time Table Change ) बदल करण्यात आला आहे.
अस असणार वेळापत्रक -
या ब्लॉक कालावधीत कल्याण येथून ०७.४७ ते २३.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा दिवा आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व या सेवा मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. तर या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या व मुलुंड येथून ०७.४२ ते ०१.१५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या/अर्ध-जलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व कळवा आणि मुंब्रा येथे थांबणार नाहीत. पुढे दिवा स्थानकावर डाउन धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ब्लॉक कालावधीत कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
शनिवारी या गाड्या रद्द -
- 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस
- 17611 नांदेड- मुंबई एक्सप्रेस
- 11030 कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस