मुंबई -मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Corona Active Patients Mumbai ) रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज ( सोमवारी ) १७६ रुग्णांची ( Corona 176 patients Mumbai ) तर ३ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १६४ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१७६ नवे रुग्ण -मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ३५८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. १६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २३ हजार ०८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १ हजार ६१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८२६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २९९२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२३ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या स्थिर -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७, १९ जुलैला २८४, २० जुलैला २९०, २१ जुलैला २७३, २२ जुलैला २९९, २३ जुलैला २६६, २४ जुलैला २३८, २५ जुलैला १७६ रुग्णांची नोंद झाली आहे.
११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा -Nandurbar : गर्भवती महिलेचा वेदनेने विव्हळत असताना बांबुच्या झोळीत 3 तास जीवघेणा प्रवास