महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Free Blindness : राज्यात 17 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित; महाराष्ट्राला अंधत्वमुक्त करणार - तात्याराव लहाने - Maharashtra Free Blindness

कोरोनामुळे राज्यातील सतरा लाख मोतीबिंदूं शस्त्रक्रिया प्रलंबित ( Seventeen lakh cataract surgeries are pending in Maharashtra ) आहेत. या शस्त्रक्रिया करून महाराष्ट्राला अंधत्व मुक्त ( Maharashtra Blindness Free ) करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर त्यात्याराव लहाने ( Dr. TyatyaRao Lahane ) यांनी दिली. राज्य सरकारच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात येणार असून पुढील दोन वर्षात सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Dr. TyatyaRao Lahane
डॉक्टर त्यात्याराव लहाने

By

Published : Oct 14, 2022, 4:00 PM IST

मुंबई -राज्यात गेल्या दोन वर्षांपासून टाळेबंदी, कोरोनामुळे डोळ्यांच्या तसेच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया प्रलंबित ( Cataract surgery pending ) आहेत. दोन वर्षांपासून सुमारे 17 लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया राज्यभरात प्रलंबित ( Seventeen lakh cataract surgeries are pending in Maharashtra ) आहे. तर देशभरात हा आकडा एक कोटी शस्त्रक्रिया पर्यंत जातो. अंधत्वला कारणीभूत असलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात करायचे आहे. राज्याला अंधत्व मुक्त ( Maharashtra Blindness Free ) करण्यायासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉक्टर लहाने ( Dr. TyatyaRao Lahane ) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात 350 केंद्रांमधून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष भरून काढणार -कोविड, टाळेबंदीमुळे महाराष्ट्र मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये मागे पडला आहे. सुमारे 17 लाख शस्त्रक्रिया प्रलंबित असून हा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष अभियानाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या मोहिमेचा हा एक भाग असणार आहे. मोतीबिंदू हा अंधत्वासाठी कारणीभूत ठरणारा आजार आहे. मात्र, तो वेळीच शस्त्रक्रियेने दूर करता येतो. 2017 मध्ये राज्य सरकारने मोतीबिंदू शस्त्रक्रिये बाबत विशेष अभियान राबवले होते. त्यावेळी महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आताही अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिली.

घरोघरी सर्वेक्षण करणार -या मोहिमेअंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. लहान मुलांना आढळणारे डोळ्याचे विकार,मधुमेही रुग्णांना होणारे डोळ्याचे विकार, तसेच अन्य डोळ्याच्या विकारांचा मागोवाही या अभियानादरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दोन वर्ष हे अभियान राबवले जाणार आहे. पुढील महिन्यात या अभियानाची सुरुवात होणार असल्याची माहिती डॉक्टर लहाने यांनी दिली.

अभियानात संस्थांचा सहभाग -महाराष्ट्र अंधत्व मुक्त अभियानामध्ये राज्यातील खाजगी आणि शासकीय सत्तावन्न वैद्यकीय महाविद्यालय, 36 नेत्रविकार केंद्र पस्तीस अशासकीय संस्थांचा या अभियानामध्ये सहभाग घेण्यात येणार असून सुमारे 350 केंद्रांवर नेत्रविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती ही डॉक्टर लहाने यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details