महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1628 नवे रुग्ण, 47 रुग्णांचा मृत्यू - मुंबईत कोरोनाचे 1628 नवे रुग्ण बातमी

मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 1628 नवे रुग्ण आढळून आले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 87 हजार 778 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 549 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1669 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 617 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत.

1628 new corona positive patients found and 47 coronary died in mumbai
मुंबईत कोरोनाचे 1628 नवे रुग्ण

By

Published : Sep 22, 2020, 9:36 PM IST

मुंबई - महानगरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मंगळवारी मुंबईत कोरोनाच्या 1628 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 1628 नवे रुग्ण आढळून आले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 16 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 87 हजार 778 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 549 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1669 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 52 हजार 204 वर गेला आहे. सध्या मुंबईत 26 हजार 664 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवस तर सरासरी दर 1.16 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 617 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. 10 हजार 065 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 10 लाख 22 हजार 711 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details