मुंबई- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देऊन महाविकासआघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती यात केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचे सह्या केलेले पत्र असून ते आम्ही राज्यपालांना दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर पाठिंब्यासाठी पाहिजे असल्यास या सर्व 162 आमदारांची राज्यपालांपुढे परेड करू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -अजित पवारांच्या अनुपस्थित मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला पदभार
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ ही अवैध आहे. यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांनी लोकशाहीच्या प्रक्रियेचा गळा घोटल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलेल्या सह्यांच्या पत्राचा अजित पवार यांनी गैरवापर केल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आमच्याकडे बहुमतापेक्षा जास्त आकडा असून आम्हाला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलवावे असेही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सांगितले आहे.