मुंबई -गणपती बाप्पांची पंढरी असलेल्या लालबागमध्ये गणेशोत्सवादरम्यान भाविकांचा जनसागर उसळतो. तसेच अनंत चतुर्दशीदिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी परळ, लालबाग, गिरगाव या ठिकाणी देखील भाविकांची तुफान गर्दी होते. त्याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे आणि गुन्हेगार भाविकांच्या खिशावर डल्ला मारतात (disadvantage of crowd during immersion procession). काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 11 सोनसाखळी चोरीचे गुन्हे आणि 150 ते 160 पर्स (160 purses mobiles stolen from Lalbagh) मोबाईल तसेच कागदपत्रे गहाळ झाल्याच्या घटना दाखल आहेत.
काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेश आगमन ते गणेश विसर्जन म्हणजेच दिनांक ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान मोबाईल चोरी तसेच सोनसाखळी चोरीचे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच उघड गुन्ह्यामध्ये एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.