मुंबई -शिवसेना आणि शिंदे गट यांच्या बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शिवसेनेने पक्षाचा व्हीप झुगारुन आमदारांविरोधात मतदान केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्या सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते ( Sixteen MLAs can be disqualified ) असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे ( Congress state president Nana Patole ) . तसेच परिछेद 10 नुसार पक्षांतर बंदी कायद्याचा फटका सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला बसेल असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे ( Shinde group will hit by defection ban law ). आपल्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
एकमेकांना मारण्याचा प्रकार चुकीचा -मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला. मात्र विरोधकांवर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण देशामध्ये 2014 नंतर मोदी सरकार आल्यानंतर अशा प्रकारची संस्कृती तयार होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे ( Nana Patole Criticize central government ). मात्र महाराष्ट्रात अशी संस्कृती निर्माण होऊ नये त्यासाठी सर्वच पक्षाने काळजी घेतली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.