मुंबई -विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने ( MSRTC) अखेर संपकऱ्यांवर जोरदार कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कर्तव्यावर हजर होत आहे. आज (दि. 6) राज्यभरात संप सोडून १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.
७३ हजार ३७८ कर्मचारी संपामध्येच -
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. तब्बल ३३ दिवस होऊनही एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली. महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील १ हजार ९९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून ९ हजार ६२५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे महामंडळाने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आता संपात सहभागी होणाऱ्या कर्मचारी संप सोडून कर्तव्यावर हजर होत आहे. आज राज्यभरात १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. तरीही ७३ हजार ३७८ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी ( ST Workers Strike ) असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
आज एसटी कर्मचारी उपस्थिती
प्रशासकीय कर्मचारी- ९ हजार ४२६ पैकी आज ९ हजार ४०२कर्मचारी हजर