महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MHADA Konkan Mandal : सदनिका कागदपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी - म्हाडा कोंकण मंडळ बातमी

म्हाडा कोंकण मंडळाच्या 2021 च्या सदनिका ( MHADA Konkan Mandal ) सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 15 फेब्रवारी पर्यंत ही मुदतवाढ दिली आहे.

MHADA
MHADA

By

Published : Feb 13, 2022, 1:54 PM IST

मुंबई - म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ऑक्टोबर 2021 मध्ये ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात आली ( MHADA Konkan Mandal ) होती. त्यातील 20 टक्के संकेत क्रमांक २८२ ते संकेत क्रमांक ३१९ पात्रता/पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रे मुदतीमध्ये सादर करु न शकलेल्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

१९१ अर्जदारांनी कादपत्रे सादर केले नाही

पात्रता/अपात्रता निश्चित करण्यासाठी अर्जदारांना तात्काळ प्रथम सूचना पत्रे पाठवली गेली होती. सोडतीमधील ८१२ यशस्वी अर्जदारांपैकी ६२१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत कागदपत्रे सादर केली. पण, १९१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केली नाही. या अर्जदारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या संपूर्ण राज्यभरात निर्धारित केलेल्या शाखांत 15 फेब्रुवारी २०२२ पर्यंत कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन कोंकण मंडळाने केले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut On Bjp : संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, "ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून..."

ABOUT THE AUTHOR

...view details