मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1736, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715 तर, आज सोमवारी 18 ऑक्टोबरला 1485 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा -सर्व आरोपींप्रमाणेच आर्यन खानचेही समुपदेशन - समीर वानखेडे
आज 27 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 78 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.4 टक्के तर, मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
28,008 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 1485 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 93 हजार 182 वर पोहोचला आहे. तर, आज 27 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 816 वर पोहोचला आहे. आज 2 हजार 78 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 21 हजार 756 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.4 टक्के तर, मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 11 लाख 16 हजार 353 नमुन्यांपैकी 65 लाख 93 हजार 182 नमुने म्हणजेच, 10.79 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 8 हजार 613 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 28 हजार 8 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -