Corona Update - राज्यात 1410 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू - etv bharat live
आज राज्यात 1520 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 02 हजार 961 वर पोहचला आहे. तर आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 16 वर पोहचला आहे.
मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज रविवारी 24 ऑक्टोबरला 1410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 18 मृत्यूंची नोंद झाली असून 1520 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
23,894 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 1520 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 02 हजार 961 वर पोहचला आहे. तर आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 16 वर पोहचला आहे. आज 1520 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 35 हजार 439 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 18 लाख 93 हजार 695 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.67 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 401 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 23 हजार 894 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715, 18 ऑक्टोबरला 1485, 19 ऑक्टोबरला 1638, 20 ऑक्टोबरला 1825, 21 ऑक्टोबरला 1573, 22 ऑक्टोबरला 1632, 23 ऑक्टोबरला 1701, 24 ऑक्टोबरला 1410 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 400
अहमदनगर - 132
पुणे - 170
पुणे पालिका - 81
हेही वाचा -India pak Match : भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने ज्यूसच्या खरेदीवर एक ज्यूस फ्री