महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Suicide Case : वडाळ्यात खळबळ! डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये 14 वर्षे मुलाची शौचालयात गळफास लावून आत्महत्या

By

Published : Sep 15, 2022, 9:37 AM IST

मुंबईतील वडाळा पश्चिम भागात डाॅन बाॅस्को शेल्टर होममध्ये ( Suicide in Don Bosco Shelter Home in Wadala West ) उमेश बापू चव्हाण या 14 वर्षीय मुलाने ( Umesh Bapu Chavan Committed Suicide ) संडासामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ( In Case Under IPC Section 305 has been Registered ) आहे.

Wadala West Mumbai Suicide Case
डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये 14 वर्षे मुलाची आत्महत्या

मुंबई : वडाळा पश्चिम येथील डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये ( Suicide in Don Bosco Shelter Home in Wadala West ) उमेश बापू चव्हाण वय 14 वर्षे याने शौचलायात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ( In Case Under IPC Section 305 has been Registered ) आहे. वडाळा पश्चिम येथील डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये उमेश बापू चव्हाण वय 14 वर्षे याने दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 08.00 वाजताच्या दरम्यान शेल्टर होममधील सार्वजनिक शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली ( Case Registered at Matunga Police Station ) केली होती.

मुंबईत वड्याळ्यातील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

त्या मुलाला या संस्थेमधील हेड फादर लेस्टर फर्नांडिस व इतर स्टाफ यांनी उपचाराकामी तत्काळ सायन रुग्णालय येथे दाखल केले होते. परंतु, त्यास येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर रात्री 8.45 वाजता दाखलपूर्व मयत घोषित केले. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र, आज मृतकाची आई संगीता बाप्पू चव्हाण यांनी फिर्यादी जबाब दिल्याने माटुंगा पोलीस ठाणे येथे डॉन बॉस्को शेल्टर होम येथील संबंधित जबाबदार इसमाविरोधात भादंवि कलम 305/22 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील मयताचे शव पुढील अंत्यविधीकरिता त्याची आई संगीता बापू चव्हाण व इतर नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : Rape on disable Girl in Indapur : १३ वर्षीय अपंग आणि मतिमंद मुलीवर ऊसात नेऊन केला बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details