मुंबई -देशात इंधन दरवाढीचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत ( Petrol diesel price hike ) आहे. मुंबईत आज पेट्रोल, डिझेलच्या दरात अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची वाढ झाली. तर, दिल्लीत पेट्रोल, डिझेल ८० पैशांनी महागले आहे. गेल्या १६ दिवसांत तब्बल १४ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसत आहे.
देशात पेट्रोल - डिझेल दरवाढीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. सरकारी तेल कंपन्यांनी लिटरमागे ८० पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत आज पेट्रोल १०५.४१, डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलिटर असे दर आहेत. तर, मुंबईत पेट्रोल १२०.५१, डिझेल १०४.७७ रुपये प्रतिलिटर असणार आहे. अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची यात आज वाढ झाली आहे. दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोल तब्बल १५ रुपये महाग मिळत आहे.
राज्यातील काही इतर शहरांमधील पेट्रोल-डिझेलदर खालीलप्रमाणे
हिंगोली