मुंबई - मुंबईच्या धारावी परिसरात सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची ही घटना रविवारी (दि. 29 ऑगस्ट) दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास घडली आहे. जखमींमधील पाच जणांची स्थिती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धारावी येथील शाहू नगर, कमला नगर येथील मुबारक हॉटेलसमोर सिलिंडरचा स्फोट झाला. दुपारी साडे बाराच्या सुमारास हा सिलिंडर स्फोट झाला. सिलेंडर स्फोट झाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या 15 जणांना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 5 जण 50 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. तर इतर 10 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
जखमींची नावे
1) राजेशकुमार जैस्वाल - पुरुष 45 वर्षे
2) अबिना बीबी शेख - महिला 27 वर्षे
3) गुलफान अली - पुरुष 29 वर्षे
4) अलिना अन्सारी - महिला 5 वर्षे
5) मो. अब्दुल्ला - पुरुष 21 वर्षे
6) असमा बानो - महिला 18 वर्षे
7) फिरोझ अहेमद - पुरुष 35 वर्षे