महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

१४ मॉल्सकडून अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर, कारवाई ऐवजी चार महिन्यांची मुदत - मॉल्सकडून अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन नाही

१४ मॉल्सकडून मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशांवर कठोर कारवाई करण्याऐवजी अग्निशमन दलाकडून चार महिन्यांची मुदत दिली आहे.

fire safety rules in malls
fire safety rules in malls

By

Published : Jan 30, 2021, 5:11 AM IST

मुंबई - मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीचे पडसाद उमटले होते. त्यानंतर मुंबईमधील मॉलची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. १४ मॉल्सकडून मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशांवर कठोर कारवाई करण्याऐवजी अग्निशमन दलाकडून चार महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांकडून मॉल्सना पाठीशी घातले जात असल्याचे बोलले जात आहे.

अग्निसुरक्षा यंत्रणाच नाही-

नागपाडा येथील सिटी सेंटर मॉल आगीनंतर मुंबईतील मॉल्सच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. स्थायी समितीत याचे तीव्र पडसाद उमटले होते. मुंबईतील कोणत्याही मॉल्समध्येही अग्निसुरक्षा नसल्याचा गंभीर प्रकार सदस्यांनी निदर्शनास आणून दिला होता. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मॉल्सचे सर्वेक्षण करून अग्निसुरक्षा नसलेल्या मॉल्सवर कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर मनपा अग्निशमन दलाकडून मुंबईतील सर्व ७१ मॉल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. पैकी ५७ मॉल्समध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना कार्यान्वित आहेत. तर १४ ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाब समोर आली आहे. या मॉल्सना अग्निसुरक्षा व्यवस्थेची पूर्तता करण्यासाठी अग्निशमन दलाने चार महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानंतरही कार्यवाही न केल्यास विधी खात्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, वीज - पाणी कापणे, सील लावण्याची प्रक्रिया होऊ शकते अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

कारवाईसाठीही लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर -

सिटी सेंटर आगीनंतर मॉल्स, रेस्टॉरंट, बारमधील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश स्थायी समितीत देण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाने मॉल्स, रेस्टॉरंट, बारच्या मालकांना स्थायी समिती अध्यक्ष, सपाचे गटनेत्यांच्या तक्रारीवरुन कारवाई करत असल्याचे सांगण्यात आले. स्थायी समितीत याप्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. परंतु, आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कठोर कारवाई झाली नसल्याचे स्थायी समिती सदस्यांचे म्हणणे आहे.

अग्निशमन अधिकाऱ्याने पळ काढला -

अग्निशमन अधिकारी म्हणतात, सहानंतर माहिती मिळणार नाही. मॉलच्या कारवाई संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी कैलास हिवराळे यांच्याशी संपर्क साधला असता, तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास सायंकाळी सहा वाजेपर्यंतच संपर्क साधा. मात्र, त्यानंतर कोणतीही माहिती मिळणार नाही, अशी उडावाउडवीची उत्तरे देऊन पळ काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details