मुंबई - महाविकासआघाडी मध्ये शिवसेनेच्या खासदारांना सन्मान आणि निधी मिळत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून त्यांना विचारले जात नाही, ही खंत शिवसेनेच्या खासदारांना मध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे सर्व खासदार निवडून आले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलत हिंदुत्वाची कास सोडली. याबाबतची नाराजगी सर्व खासदारांमध्ये आहे, असे भाजपा नेते आमदार प्रसाद लाड म्हणाले.
MLA Prasad Lad Statement : शिवसेनेचे 14 नाराज खासदार भाजपासोबत येणार! - disgruntled shivsena mp
खासदारांच्या मनात असलेली नाराजी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्की दिसेल. या कारणामुळे लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेचे खासदार भाजपाशी जोडले जातील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. 13 ते 14 खासदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे मुंबई आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
2024 च्या निवडणुकीत परिणाम दिसतील - खासदारांच्या मनात असलेली नाराजी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्की दिसेल. या कारणामुळे लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेचे खासदार भाजपाशी जोडले जातील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. 13 ते 14 खासदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे मुंबई आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
निधी मिळत नसल्याने खंत - गेल्या काही दिवसापासून शिवसेनेमध्ये निधी मिळत नसल्याबाबत खासदार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गजानन कीर्तिकर आणि मावळचे खासदार गजानन बाबर यांनी महा विकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच इतरही खासदारांकडून निधी मिळत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा शिवसेनेच्या गोटामध्ये आहे.