महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष - भाडेवाढीनंतरही दररोज एसटीला १४ कोटींचा तोटा!

4 हजार 549 कोटी रुपयांचा तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटीं रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

14 crore loss to ST
14 crore loss to ST

By

Published : Oct 26, 2021, 6:37 PM IST

मुंबई -गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागल्याने एसटीचा संचित तोटा दहा हजार कोटींचा घरात पोहोचला आहे. सध्या एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच सततचा इंधन दरवाढीमुळे मोठी झळ महामंडळाला बसू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १४ कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने १७.१७ टक्के भाडेवाढ केली आहे. मात्र, या भाडे वाढीमुळे सुद्धा एसटीचा तोटा भरून निघणे शक्य नाही आहे.

3 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाचे अर्थचक्र मंदावले आहे. या मंदावलेल्या अर्थ चक्राला गती देण्यासाठी उद्योग धडपड करत आहे. एसटी महामंडळही याच परिस्थितीतून जात आहे. गेल्या 72 वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणखी किफायतशीर प्रवासी दळणवळणाची सेवा देणारी लालपरी आता कोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. 4 हजार 549 कोटी रुपयांचा तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटीं रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. याशिवाय इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात आली आहे.

दररोज इतक्या कोटीचा तोटा
गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाची चाक हळूहळू रुळावर येत होते. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांची आवक अत्यंत कमी आहे. तरी सुद्धा राज्यभरात एसटी महामंडळाचा १२ हजार पेक्षा जास्त बसेस रस्त्यांवर धावत आहे. कोरोनापूर्वी प्रति दिवस एसटी महामंडळाला 22 कोटी रुपयांचे महसूल मिळत होते. त्यावेळी महामंडळाला 3 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. सध्या एसटी बसेस १२ कोटी रुपये प्रतिदिवस महसूल मिळत असल्याने सरासरी एसटीला प्रत्येक दिवस १४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.आता नव्या भाडे वाढीमुळे एसटी महामंडळाला प्रतिदिवस दोन कोटी रुपयाचा महसूल वाढणार आहे. यामुळे भाडेवाढीमुळे तोट्या पूर्णपणे भरून निघणार नाही.

हेही वाचा -टी 20 मध्ये भारताचा पराभव: हार कर जीतेने वाले को ही बाजीगर कहते है- सोनू सूद

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
एसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरून फक्त 7 हजार 800 कोटी इतके उत्पन्न मिळते. तर एसटी महमंडळाच्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे.
===================
संचित तोट्याची आकडेवारी
आर्थिक वर्षसंचित तोटा (कोटींमध्ये)
2014-15 = 1 हजार 685
2015-16 = 1 हजार 807
2016-17 = 2 हजार 330
2017-18 = 3 हजार 663
2018-19 = 4 हजार 549
2019-20 = 5 हजार 192
2020-21 = 9 हजार 500
=================
हेही वाचा -माझा नवरा खोटारडा नाही, रोज काय स्पष्टीकरण द्यायचे- क्रांती रेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details