मुंबई -कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यात 40 हजारांच्या घरात नवीन कोरोना रुग्णांची(corona new patients) संख्या जात आहे. कोरोनाकाळात नागरिकांच्या सेवेत राहणाऱ्या अनेक पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मागील दोन दिवसात मुंबई पोलीस दलातील 132 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Two Mumbai Police Died) आहे.
- 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबई पोलीस दलातील 13 DCP, 4 अतिरिक्त CP आणि एक जॉइंट CP (L&O) यांच्यासह 114 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच गेल्या 48 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबई पोलीस दलात आतापर्यंत एकूण 523 रुग्ण सक्रिय असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- मुंबईत रविवारी १९ हजार ४७४ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू तर ओमायक्रॉनचे ४० रुग्ण
मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी (९ जानेवारी) १९ हजार ४७४ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona Update ) आहे तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परदेशातून आलेला एक व मुंबईतील ३९, असे ४० रुग्ण ओमायक्रॉन रुग्ण ( Omicron Patients in Mumbai ) आढळले आहेत.
कोरोना योद्धयांची भूमिका बजावणारे नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ लागली ( Navi Mumbai Police Covid Infected ) आहे. गत आठवडाभरामध्ये 102 पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झाले आहेत. यात 22 पोलीस अधिकारी व 80 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, यातील 9 पोलिसांवर विविध रुग्णांलयात तर उर्वरीत सर्व पोलीस होम क्वॉरंटाईन राहून उपचार घेत आहेत. या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) अभिजीत शिवथरे ( DCP Abhijit Shivthare ) यांनी दिली.