महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार, शिंदे सरकारची मोठी घोषणा - शिंदे सरकारची मोठी घोषणा

नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. एनडीआरएफचे जेवढे पैसे मिळत होते त्याचे दुप्पट पैसे मिळतील. एनडीआरएफनुसार ६ हजार मिळत होते. मात्र, आता दुप्पट भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शिंदे सरकारच्या ( Relief fund announced for flood affected farmers ) निर्णायानुसार शेतकऱ्यांना आता 13, 600 रुपये मिळणार आहेत.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

By

Published : Aug 10, 2022, 9:02 PM IST

मुंबई - मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्यांदाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज ( बुधवारी ) पार पडली. गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. ( Relief fund announced for flood affected farmers ) एनडीआरएफचे जेवढे पैसे मिळत होते त्याचे दुप्पट पैसे मिळतील. एनडीआरएफनुसार ६ हजार मिळत होते. मात्र, आता दुप्पट भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शिंदे सरकारच्या निर्णायानुसार शेतकऱ्यांना आता 13, 600 रुपये मिळणार आहेत.

दुसरी मोठी घोषणा :आजच्या कॅबिनेटमध्ये आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे मेट्रो 3 बाबत वाढलेली किंमत मंजूर करण्यात आली. गेल्या काही काळात हा प्रकल्प रखडल्याने 10 हजार कोटींनी किंमत वाढली आहे. आता 33 हजार कोटी किंमतीचा हा प्रकल्प झाला आहे. जो 23 हजार कोटीची किंमतीचा होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाची 85 टक्के कामे पूर्म झाली आहेत. तर कार डेपोचे काम 29 टक्के पूर्ण झालेले आहे. ते मार्गी लावायचे आहे. 2023 साली पहिला फेज सुरु करायचा आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले आहे.


नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत :राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा -Mumbai Metro मुंबई मेट्रो २०२३ पर्यंत धावणार

ABOUT THE AUTHOR

...view details