मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज बुधवारी 13 ऑक्टोबरला 2 हजार 219 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 49 मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
29,555 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 2219 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 83 हजार 896 वर पोहचला आहे. तर आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 670 वर पोहचला आहे. आज 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 11 हजार 75 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 5 लाख 46 हजार 572
नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने म्हणजेच 10.87 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 29 हजार 555 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -