महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

12th Math Statistic Paper Leak : बारावी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटला; गणित आणि संख्याशास्त्र पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल - 12th Paper Leak News

बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्यांची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा बारावीच्या गणित ( 12th Math Statistic Paper Leak ) आणि संख्याशास्त्र विषयाचा पेपर फुटल्यांची ( 12th Statistic Paper Leak ) घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे घडली आहे.

12th Math Statistic Paper Leak
बारावी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटला

By

Published : Mar 14, 2022, 7:31 PM IST

मुंबई (अहमदनगर) -बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्यांची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा बारावीच्या गणित ( 12th Math Statistic Paper Leak ) आणि संख्याशास्त्र पेपर फुटल्यांची ( 12th Statistic Paper Leak ) घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे घडली आहे. अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस या प्रकरणांची चौकशी करत आहेत. मात्र, सतत बारावीच्या परीक्षेचे पेपरफुटीमुळे वितरण करून संताप व्यक्त केला जात आहे.

गणित आणि संख्याशास्त्राचा पेपर व्हायरल -

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचा परीक्षा केंद्रावर इयत्ता बारावी परीक्षेचा गणित आणि संख्याशास्त्र या विषयाच्या पेपर फुटीची घटना घडली आहे. आज सकाळी १०:३० ते २:०० या वेळेत गणित आणि संख्याशास्त्र या विषयाच्या पेपरचे आयोजन करण्यात आले होते. पेपर सुरु झाल्यानंतर सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी गणित आणि संख्याशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या काही भागाचे फोटो श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वाळके यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाले. वाळके यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी अशोक कडू यांना प्रकरणी माहिती दिली. कडूस यांनी तात्काळ श्रीगोंदा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता, परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले. या प्रकरणी घडलेल्या गैरमार्ग प्रकाराचे स्वरुप लक्षात घेता, शिक्षण अधिकारी अशोक कडूस श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद नोंदविला आहे. पोलीस या प्रकारचा तपास करत आहे.

रसायनशास्त्र पेपर फुटला -

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बारावीचा रसायनशास्त्रचा पेपर होता. मात्र रसायनशास्त्र परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्या अगोदरच मलाडच्या एका कोचिंग क्लास मधील तीन विद्यार्थ्यांना मिळाली होती. जेव्हा विलेपार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी परीक्षेला उशीरा आल्याने तिची चौकशी केली असता, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला. विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षक मुकेश यादव याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -Chemistry question paper leak : बारावीचा पेपर फुटला; रसायनशास्त्राचा पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल; मलाडच्या कोचिंग क्लास शिक्षकाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details