मुंबई -अत्यावश्यक सेवेकरी आणि त्यांनतर काेराेनाच्या दाेन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांनाच उपनगरीय लाेकलने प्रवास करण्याची मुभा असल्याने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway ) गेल्या आठ महिन्यात विना तिकिट प्रवाशांकडून १२३ काेटी ३१ लाखांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय प्रवासादरम्यान काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या २४ हजार ९४४ प्रवाशांना पकडून ४१ लाख २८ हजारांचा दंड आकारला आहे.
२४ हजार ९४४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई -
काेराेना संक्रमणामुळे लाेकल प्रवासाची परवानगी नसल्याने नाईलाजास्तव सामान्य नागरिक विनातिकीट प्रवास करायचे. तर काहीजण अत्यावश्यक सेवेकऱ्यांचे बनावट ओळखपत्र बाळगून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वेने तिकीट तपासनीसांकडून विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यास सुरुवात केली. एप्रिल ते नाेव्हेंबर दरम्यान २० लाख ६८ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या विनातिकिट प्रवाशांकडून १२३ काेटी ३१ लाखांचा दंड आकारल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. प्रवाशांनी काेराेना नियमांचे पालन करावे तसेच वैध तिकिटावर प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केले आहे.
मध्य रेल्वे पहिल्या क्रमांकावर-