मुंबई - देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वत्र लॉकडाऊन अचानक घोषित केल्यामुळे दीड महिन्यांपासून मुंबईत अडकलेले 1200 ओडिशातले मजूर आज सायंकाळी विशेष ट्रेनने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गावाकडे रवाना झाले. या विशेष ट्रेनला दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून कामगारांना निरोप दिला.
मुंबईच्या माहुल परिसरातील 1200 कामगार विशेष ट्रेनने ओडिशाकडे रवाना - 1200 कामगार विशेष ट्रेनने ओडिसाकडे रवाना
या कामगारांची व्यथा शेवाळे यांनी सरकार दरबारी मांडली. त्यांच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या समन्वयातुन या कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करून त्यांना आपल्या राज्याकडे रवाना करण्यात आले.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येने ठप्प असून लॉकडाऊन व कामाची अनिश्चितताने कामगार व मजूर लोक चिंतेत आहेत. मुंबईच्या पूर्व उपनगरातील माहुल परिसरात मोठ्या प्रमाणात रिफायनरी कारखाने आहेत. यात मोठ्या संख्येने हे कामगार व मजूर काम करतात. विषाणूच्या भीतीने हवालदिल झालेल्या येथील रिफायनरी वस्तीतील रोजंदारीवर काम करणारे कामगार आपल्या मूळ गावी बेहरामपूर येथे परतण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून ते प्रयत्न करत होते. या कामगारांची व्यथा शेवाळे यांनी सरकार दरबारी मांडली. त्यांच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या समन्वयातुन या कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करून त्यांना आपल्या राज्याकडे रवाना करण्यात आले.
कामगारांना जेवणाची पाकिटे आणि सुरक्षा किट यांची व्यवस्थाही खासदार शेवाळे यांच्यामार्फत करण्यात आली होती. या 1200 कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याची मागणी राज्य व रेल्वे मंत्रालयाने केल्याबद्ल शेवाळे यांनी आभार मानले.