महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Students Stuck In Ukraine : युक्रेनमध्ये अडकलेत महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी; अवघ्या 320 विद्यार्थ्यांशीच झाला संपर्क

रशिया आणि युक्रेन या देशांदरम्यान युद्ध भडकले ( Russia Ukraine Crisis ) आहे. युक्रेन देशात महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत अवघ्या ३२० विद्यार्थ्यांशीच संपर्क झाला ( Students From Maharashtra Stuck In Ukraine ) असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) यांनी दिली आहे.

Students Stuck In Ukraine
युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी

By

Published : Feb 25, 2022, 8:07 PM IST

Updated : Feb 25, 2022, 8:44 PM IST

मुंबई- रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे तेथली परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध ( Russia Ukraine Crisis ) सुरू झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच महाराष्ट्रातून शिक्षण घेण्यासाठी गेलेले बाराशे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले ( Students From Maharashtra Stuck In Ukraine ) आहे. यातील 320 विद्यार्थ्यांचा संपर्क झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

युक्रेनमध्ये अडकलेत महाराष्ट्राचे 1200 विद्यार्थी.. त्यापैकी अवघ्या ३२० विद्यार्थ्यांशीच झाला संपर्क

इमर्जन्सी संपर्क क्रमांक जाहीर

विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले देशभरातील विद्यार्थी अडकले आहेत. यात महाराष्ट्राच्या 1200 विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. यापैकी 320 विद्यार्थी आणि पालकांशी आमचा संपर्क झालेले आहेत. आणखी उर्वरित विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क साधत आहोत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल जाहीर केला ( Helpline For Maharashtra Students In Ukraine ) आहेत. दूरध्वनी क्रमांक 02222027990, मोबाईल क्रमांक- 9321587143 आणि ईमेल controlroom@maharashtra.gov.in जाहीर केला आहेत. या नंबरवर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना केलेले आहे.

राज्य सरकार मदत करणार

युक्रेनमधून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. सध्याची परिस्थिती बघता युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. मात्र, बाजूच्या देशातून विमान जर घेतले, तर त्यासाठी तयारी दर्शविली आहे. सध्या महाराष्ट्र्रातील 1200 विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याची तयारी आम्ही केली आहे. काही विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही एमर्जेंसी संपर्क केंद्र सुरू केले आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मदत होईल यासाठी हेल्पलाईन सुद्धा सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सर्व मदत करत आहे. त्यांना जी मदत हवी आहे ती देण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेले आहे.

Last Updated : Feb 25, 2022, 8:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details