मुंबई -26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला यावेळेस 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 197 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर, 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 पैकीं 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला होता. पाहुयात 'ई टीव्ही भारत'चा सविस्तर रिपोर्ट...
- या 10 ठिकाणी झाले हल्ले
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ले केले होते. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागच्या गल्लीत देखील हा हल्ला घडवण्यात आला होता. याबरोबरच विलेपार्ले परिसरात एका टॅक्सीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
26 नोव्हेंबरच्या दिवशी रात्री आठ वाजता मुंबईत दाखल झालेले 10 दहशतवादी हे वेगवेगळ्या गटात विखुरले होते. यात दोघांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा व खाण्यापिण्याचे सामान होते. मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, नरीमन हाऊस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, विलेपार्ले अशा ठिकाणी गेलेल्या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावली होती. यामध्ये मुंबई पोलिसांच्या 18 जवानांना वीरमरण आले होते. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी 400 लष्कर कमांडो, 300 एनएसजी कमांडो तसेच 100 मार्कोस कमांडो हे घटनास्थळी पाठवण्यात आले होते.
- या देशातील नागरिकांचा झाला मृत्यू
दहशतवादी हल्ल्यात तब्बल 178 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात अमेरिकेच्या 4 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात ऑस्ट्रेलियाचे 4, कॅनडा देशातील 3 नागरिक, जर्मनीचे 3 नागरिक, इस्त्राईलच्या 2 नागरिकांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच फ्रान्सच्या 2, ब्रिटन, सायप्रस, इटली, जपान, मॉरिशस, मेक्सिको, सिंगापूर, थायलंड, नेदरलँडच्या प्रत्येकी एका नागरिकांचा या हल्ल्यात मारला होता.
- 26/11 च्या हल्ल्यानंतर आजची मुंबईच्या सुरक्षेची स्थिती
देशातील आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर नेहमीच दहशतवादी हल्ल्यांच्या निशाण्यावर सतत राहिले आहे. याला अनुसरून मुंबईमध्ये नेहमीच हाय अलर्टवर पोलीस यंत्रणा काम करत असतात. तर, मुंबई शहराबद्दल बोलायचं झालं तर मुंबईची लोकसंख्या ही जवळपास 1 कोटी 84 लाखांच्या आसपास आहे. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी आजच्या घडीला 42 हजार पोलिसांचा फौजफाटा हा उपलब्ध आहे.
- मुंबईत 5500 सीसीटीव्हीचे जाळे -
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. मुंबईतल्या कुठल्याही भागात जर एखादी संशयास्पद हालचाली होत असेल, किंवा एखादा गुन्हा घडत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी , आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई शहरात 5500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे.
- 26/11 हल्ल्यानंतर पोलीस खात्यात मोठे बदल