महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : मुख्यमंत्री मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर, सेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उद्या दिल्लीत असणार आहेत. शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून उद्या दिल्लीत हे 12 आखासदार ( MP of Shiv Sena ) एकनाथ शिंदे यांना समर्थन ( Shiv Sena 12 MP Support to Eknath Shinde ) घोषित करण्याची शक्यता आहे.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jul 18, 2022, 10:36 PM IST

Updated : Jul 18, 2022, 10:51 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उद्या दिल्लीत असणार आहेत. आज रात्री अकराच्या सुमारास ते विमानाने दिल्लीला पोहचतील. शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून उद्या दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार ( MP of Shiv Sena ) एकनाथ शिंदे यांना समर्थन ( Shiv Sena 12 MP Support to Eknath Shinde ) घोषित करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तसेच यावेळी भारतीय जनता ( Bjp ) पक्षाचे ज्येष्ठ नेते यांसोबत देखील मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा -यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah ) किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda ) यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आज झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत ( Presidential Election ) शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु ( Draupadi Murmu ) यांना पाठिंबा जाहीर केला होता. द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर दबाव बनवला होता. खासदार राहुल शेवाळे, खासदार राजेंद्र गावित यांनी तर याबाबतचा पत्रच उद्धव ठाकरे यांना देऊन आपली भूमिका निवडणुकीआधीच स्पष्ट केली होती.

हेही वाचा -Presidential Election : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांवर कारवाईचे संकेत -आज सायंकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार शिवसेनेसोबत असल्याचेच सांगितले. मात्र शिवसेनेच्या कोणत्याही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांना पाठिंबा दर्शवला त्यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं सरकार असंवैधानिक मार्गाने राज्यात आणला आहे. त्यामुळे 20 जुलैला होणार्‍या सर्वोच्च न्यायालयात तू लावणी दरम्यान न्यायालय योग्य तो न्याय करेल असा विश्वास ही संजय राऊत यांच्याकडून या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे.



हेही वाचा -Washim Hijab controversy : विद्यार्थिनींने हिजाब घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला

Last Updated : Jul 18, 2022, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details