मुंबई - 12 मार्च हा दिवस 'जागतिक किडनी दिन' म्हणून भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये किडनी आजारासंदर्भात जनजागृती करणे हा आहे. 2006 पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भारतामध्ये किडनी आजारग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. बऱ्याचदा आपण किडनी प्रत्यारोपण या विषयी अनेकदा ऐकतो, वाचतो किंवा काही प्रसंगी आपण अशा रुग्णांना भेटतो देखील. अनेक वेळा क्ष व्यक्तीचे किडनी ट्रान्सप्लांट करायचे आहे, असे म्हटले जाते . मात्र नेमकं किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय आणि नेमकं किडनी दान कोण करू शकतं? याविषयी आम्ही तज्ञांचे मत जाणून घेतलं.
हेही वाचा -अंबानींना धमकी देणारा जैश-उल-हिंदचा ग्रुप तिहार जेलचा
किडनी आजार तज्ज्ञ डॉक्टर सचिन सोनी सांगतात
65 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या आणि नेहमीच किडनी आजाराने ग्रस्त आहे अशा रुग्णांना नेहमीच डायलेसिस पेक्षा किडनी प्रत्यारोपण हा एक नेहमी चांगला पर्याय आहे. आपल्याकडील नियमानुसार किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी एका दात्याची किंवा डोनर ची गरज असते. याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार रिलेटेड किडनी डोनर.
हेही वाचा -हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त देशातील 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच क्लिकवर
रिलेटेड किडनी डोनर-