महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

11th Online Admission Schedule Change अकरावी ऑनलाइन प्रवेश वेळापत्रकात गणेश उत्सवामुळे बदल

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रीयेच्या 11th Online Admission वेळापत्रकात गणेश उत्सवामुळे बदल Schedule Change करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांच्या Maharashtra State Director of Higher Secondary Education आदेशानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झाले होते. मात्र, गणेशोत्सवामुळे या वेळापत्रकात नुकताचं बदल करण्यात आलेला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना आता 2 सप्टेंबर 2022 पर्यंत आपले प्रवेश निश्चीत करता येणार आहेत.

admission process
प्रवेशप्रक्रीया

By

Published : Aug 28, 2022, 1:25 PM IST

मुंबईदोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यामुळेच, राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार, प्रवेशप्रक्रीयेच्या वेळापत्रकात नुकताचं बदल 11th Online Admission Schedule Change करण्यात आलेला आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झाले होते. मात्र, गणेशोत्सवामुळे मुळ वेळापत्रकात नुकताचं बदल करण्यात आलेला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना आता 2 सप्टेंबर 2022 पर्यंत आपले प्रवेश निश्चीत करता येणार आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासंदर्भात जुलैमध्येच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या आदेशानुसार मुदतवाढ द्यावी लागली होती. नियमित प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ शासनाने जाहीर केली होती. या मुदतवाढीनंतर प्रवेश फेरी एक, दोन आणि तीन तसेच विशेष प्रवेशदेखील झाले. मात्र, दरम्यान गणेशोत्सव आल्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केला गेला. या बदलामुळे विद्यार्थ्यांना निश्चितचं फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचनाImportant notice25 ऑगस्ट 2022 ते 29 ऑगस्ट 2022 या काळात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक संपादित करता येईल. अर्ज वेळेत भरावा. अर्ज भरल्यानंतर लॉक करणे जरुरी आहे. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाईल. 2 सप्टेंबर 2022 रोजी विद्यार्थी लॉगिन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविले जाईल. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये सुद्धा दर्शविली जाईल. फेरीचे कट ऑफ देखील पोर्टलवर दर्शविले जातील. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजे पर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करून विद्यालयास भेट द्यावी व वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करावा.

पुन्हा होणार विशेष फेरीअकरावी प्रवेशाची विशेष फेरी पुन्हा होत असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याने आपला पसंती अर्ज भाग दोन पुन्हा भरावा. अर्ज भरला की लॉक करावा. विद्यार्थ्याला संमती दिल्याखेरीज विशेष फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. यामुळे, अनावश्यक अर्ज बाहेर होतील. जागा अडून राहणार नाही. ज्यांना प्रवेश हवा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया सुरू होईल. विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम व गुणवत्ता यांच्या आधारे प्रवेश होतील. फेरीमध्ये दिलेल्या तीन संधी नंतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागा सर्वांसाठी खुल्या होतील. तसेच गुणवत्तेनुसार प्रवेश केले जातील. विशेष फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल.

११ वी प्रवेशासाठी शिक्षण संचालकांची विशेष सूचना Maharashtra State Director of Higher Secondary Education विद्यार्थ्यांने कोणत्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला असेल तर त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ज्युनिअर कॉलेजने केवळ डिजिटल पेमेंट मोडद्वारे विद्यार्थ्यांकडून शुल्क स्वीकारावे. प्रत्येक घटकाने दिलेल्या वेळापत्रकाची मर्यादा पाळावी. विशेष फेरीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास पसंती अर्ज भाग 2 भरणे आवश्यक आहे. गणेश उत्सव आणि दरम्यान येणाऱ्या सुट्ट्यांमुळे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार, कार्यालयीन वेळेत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर Director of Secondary and Higher Secondary Education Mahesh Palkar यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली.

हेही वाचाPM Modi Mann kI Bat कुपोषणाविरुद्ध देशात जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे, मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचे प्रतिपादन

ABOUT THE AUTHOR

...view details