मुंबई:अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी ( 11th class admission schedule ) जाहीर करण्याची अंतिम मुदत संपली आहे. केंद्रीय प्रवेशाच्या आणि कोटा अंतर्गत जागासाठी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या प्रवेश फेरी ( 11th class second round admission ) संदर्भातली मुदत 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत ( Application Deadline for 11th Online Admission ) 9 ऑगस्टपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. 12 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वाजेपासून ते 17 ऑगस्ट 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे ( Mumbai Deputy Director of Education Sandeep Sangwe ) यांच्या कार्यालयाकडून ईटीवी भारतला ( ETV Bharat info on 11th class online admission ) कळविण्यात आलेली आहे.
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया -अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी 7 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी 9 ऑगस्टपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे. तसेच द्विलक्ष विषयाच्या प्रवेशासाठी दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 11 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रवेश निश्चिती करणे जरुरी आहे. तसेच दिनांक 12 ऑगस्ट फेरी क्रमांक दुसरी प्रवेश फेरीसाठी महाविद्यालय अलॉटमेंट जाहीर केले जाणार आहे. यामध्ये कोर्टांतर्गत जे प्रवेश असतील त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यालयांनी जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासंदर्भात गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच दिनांक 12 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वाजेपासून ते 17 ऑगस्ट 2022 सायंकाळी सहा वाजेपर्यंत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे करायचा आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग संदीप संगवे यांनी ईटीव्ही भारतला दिली.