महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंताजनक! एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर पोहचली आहे. तर शनिवारी दिवसभरात 1 हजार 199 रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MUMBAI CORONA
MUMBAI CORONA

By

Published : Jul 18, 2020, 10:04 PM IST

मुंबई - राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांनी शनिवारी १ लाखाचा टप्पा गाठला आहे. तर कोरोनामुळे मुत्यू झालेल्या रुग्णांची सख्या ५ हजार ६४७ वर पोहोचली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे.

मुंबईत शनिवारी 1 हजार 199 नवे रुग्ण आढळले. तर 65 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकुण कोरोना ग्रस्तांचा आकडा 1 लाख 178 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 5 हजार 647 वर पोहचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 70 हजार 495 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 24 हजार 39 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचला आहे.

मुंबईत शनिवारी 65 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 40 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 40 पुरुष तर 25 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून 1 हजार 152 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 70 हजार 492 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 178 रुग्ण असून 70 हजार 492 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5 हजार 647 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 24 हजार 39 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवस तर सरासरी दर 1.30 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 700 चाळी आणि झोपडपट्टी कंटेमेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 235 इमारती व इमारतीच्या विंग आणि काही मजले सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 27 हजार 378 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details