महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ticket Broker Arrested : मध्य-पश्चिम रेल्वेवर १ हजार १५२ रेल्वे तिकीट दलालांना अटक

एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ६८४ गुन्हांत ८२४ दलाला पकडले आहे. त्यांच्याकडून २ कोटी १८ लाख रुपयांचे १९ हजार २६८ रेल्वे तिकिट जप्त केल्या आहेत. तर मध्य रेल्वेने २६७ गुन्हांत ३२८ दलाला अटक केली असून त्यांच्याकडून १ कोटी २० हजार रुपयांचा ७ हजार ७७४ तिकीट जप्त केले आहेत.

रेल्वे संग्रहित छायाचित्र
रेल्वे संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 25, 2022, 6:49 PM IST

मुंबई -गावी जाताना मेल-एक्स्प्रेसमध्ये कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी दलाल प्रवाशांकडून जादा पैसे घेतात. या लांब पल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ६८४ गुन्हांत ८२४ दलाला पकडले आहे. त्यांच्याकडून २ कोटी १८ लाख रुपयांचे १९ हजार २६८ रेल्वे तिकिट जप्त केल्या आहेत. तर मध्य रेल्वेने २६७ गुन्हांत ३२८ दलाला अटक केली असून त्यांच्याकडून १ कोटी २० हजार रुपयांचा ७ हजार ७७४ तिकीट जप्त केले आहेत.

रेल्वे पोलिसांचे तिकीट दलालांविरोधात विशेष अभियान :कोरोनामुळे फक्त आरक्षित तिकीट धारकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजर होत होता. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जात होते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तत्काळ तिकीट मिळविण्यासाठी अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशाना तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने आता पश्चिम आणि मध्य रेल्वेने च्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात विशेष अभियान हाती घेतले होते. त्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर २ कोटी १८ लाख रुपयांचे तिकीट जप्त :पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले, की रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष अभियान हाती घेतले होते. या अभियानांत आरपीएफ गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विभागीय रेल्वे अधिकारी यांची टीम गठीत केली होती. तिकीट तपासणी अभियानात निदर्शनात आले की, अनेक प्रवासी बोगस ओळखपत्राचा वापर करून, रेल्वे तिकीटांचे आरक्षण केले जात आहे. ज्यामध्ये बरेच आयआरसीटीसी दलांच्या त्यात समावेश होता. आरक्षित रेल्वे तिकीट काढण्यासाठी बोगस ओळखपत्रे आणि सॉफ्टलेअरचा वापर करून प्रवाशांकडून तिकिटांसाठी अतिरिक्त पैसे घेत होते. पश्चिम रेल्वे २०२१ मध्ये विशेष अभियानांतर्गत अशा ६८४ गुन्हांत ८२४ दलाला पकडले आहे. त्यांच्याकडून २ कोटी १८ लाख रुपयांचे १९ हजार २६८ रेल्वे तिकिट जप्त केल्या आहे.

सर्वाधिक तिकीट दलाल मुंबईत : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांविरोधात २६७ गुन्हे नोंदवण्यात आली असून आतापर्यंत ३२८ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दलाकडून १ कोटी २० हजार रुपयांचा ७ हजार ७७४ तिकीट जप्त केले आहेत. ज्यामध्ये ई-तिकीट आणि काउंटर तिकिटांचा समावेश आहे. २६७ गुन्ह्यांपैकी एकट्या मुंबई विभागात १२१ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत १५९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ७४ लाख रुपयांची ई-तिकीट आणि काउंटर तिकिटांसह ४ हजार ४७८ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा -ED attached Pratap Sarnaik assets : ईडीकडून प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details