मुंबई - रविवारी दिवसभरात राज्यात कोरोनाचे ११३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या सुमारे साडेसातशे झाली आहे. तसेच आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५६ लोकांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आज आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईमध्ये ८१, पुण्यामध्ये १८, औरंगाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३, कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी २, तर उस्मानाबाद आणि वसईमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. यासोबतच राज्यात एक परराज्यातील रुग्णाचाही समावेश आहे.