मुंबई -राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 100 जण अद्यापही बेपत्ता असून 50 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सोबतच संपूर्ण राज्यभरात 3 हजार 228 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
हेही वाचा -मुंबईतील डी मार्ट मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन, स्टोअर केले सील
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने थैमान घातल्याने अनेकांचे जीव गेले. खासकरून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळई गावात दरड कोसळून आतापर्यंत 52 गावकऱ्यांचा जीव गेला आहे. तर, तिथेच 53 जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासोबतच चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मुंबई या परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. तर, काही ठिकाणी दरड कोसळून निष्पाप लोकांचे जीव गेले. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकड्यांनुसार राज्यात आतापर्यंत 113 लोकांचा जीव या पूर परिस्थितीमुळे गेला आहे. तर, अद्यापही शंभर लोक बेपत्ता आहेत.
जिल्हा निहाय आकडेवारी
रायगड- 52 मृत्यू, 53 बेपत्ता, 28 जण जखमी, तर 30 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
रत्नागिरी - 21 जणांचा मृत्यू, 14 जण बेपत्ता, सात जण जखमी, तर 115 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर - 7 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता, तर 27 जनावरांचा मृत्यू झाला आहे.