महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत १११ म्यूकर मायकोसिसचे रुग्ण; बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील

By

Published : May 12, 2021, 5:38 PM IST

Updated : May 12, 2021, 10:31 PM IST

म्युकर मायकोसिसचे रुग्ण
म्युकर मायकोसिसचे रुग्ण

17:27 May 12

मुंबईत १११ म्यूकर मायकोसिसचे रुग्ण; बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील

भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे

मुंबई - मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार सुरू असताना कोरोना रुग्णांना म्यूकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत म्यूकर मायकोसिस आजाराचे तब्बल १११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या केईएम, नायर आणि सायन रुग्णलयात उपचार सुरू असल्याची माहिती भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदेनी दिली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी त्यांना ही माहिती दिल्याचे शिंदेंनी सांगितले. 

बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील

कोरोना रुग्णांना म्यूकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत या आजाराचे किती रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार कसे केले जाय आहेत. तसेच त्यांच्यावर उपचारासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती देण्याची मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे केली. याबाबत माहिती देताना काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना मुंबई शहरात १११ म्यूकर मायकोसिस रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी शीव रुग्णालयात ३२, केईएम रुग्णालयात ३४, नायर रुग्णालयात ३८ व कूपर रुग्णालयात ७ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. हा आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही, असे काकाणी यांनी सांगितले. 

तज्ञ डॉक्टरांचा गट

म्यूकर मायकोसिस या आजाराबाबत कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. आजार होऊ नये, झाल्यास उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत उपचार प्रोटोकॅल निश्चित केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु केली आहे. रोग टाळण्यासाठी उपाययोजनांची खबरदारी माहिती सर्व रुग्णालयात दिली आहे. कोविड उपचार पद्धती स्टुरॉईड आणि टोकिलिझुमॅबचा अतिवापर टाळावा. विशेषतः डायबेटिक रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी. म्यूकर मायकोसिस या आजारावर वापरण्यात येणाऱ्या ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शन व इतर औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरु केलेली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्यूकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांना ८ ते १२ आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती काकाणी यांनी दिल्याचे प्रभाकर शिंद यांनी सांगितले. 

काय आहे म्युकर मायकोसिस - 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्यूकर मायकोसिस हा आजार नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत मधुमेही कोविड रुग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा संसर्गजन्य आजार नसून मात्र वेळीच त्याचे निदान होवून त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण कायमस्वरुपी बरा होवू शकतो, अथवा रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते. या आजाराची लक्षणे सांगायचे झाल्यास करोना रुग्णाच्या चेहऱ्यावर डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळ च्या कान, नाक, घसा तज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे, अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

Last Updated : May 12, 2021, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details