मुंबई - राज्यभरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमधील कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. राज्य पोलीस दलातील १०६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये ११२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामधील १७४ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच एकूण बाधितांपैकी आजवर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
आता पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 174 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 22 अधिकारी व 152 अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 878 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 90 पोलीस अधिकारी व 878 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.