मुंबई - निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका लक्षात घेता माहीम खाडीलगतच्या 1000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत अधिक माहिती जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. माहीम येथील महानगर पालिकेच्या शाळेत रहिवाशांची तत्काळ सोय करण्यात आलीय.
माहीम खाडीलगतच्या झोपड्यांना आणि माहीम कोळीवाडा परिसराला धोका असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे होते. त्यानुसार आज सकाळपासून पालिकेची टीम सक्रिय झालीय.