मुंबई - सकाळ पासून पावसामुळे काही मतदारसंघांमध्ये निरुत्साह असताना भांडूप येथील 100 वर्षाच्या खिल्लारी राम शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून शर्मा यांनी सर्व निवडणुकांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी भांडुपमधील पवार पब्लिक स्कुलमध्ये मतदान केले असून, शर्मा यांचा जन्म 19 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.
भांडुपमध्ये 100 वर्षांच्या आजोबांनी केले मतदान; या वयातही उत्साह कायम - bhandup constituent assembly
सकाळ पासून पावसामुळे काही मतदारसंघांमध्ये निरुत्साह असताना भांडूप येथील 100 वर्षाच्या खिल्लारी राम शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी भांडुपमधील पवार पब्लिक स्कुलमध्ये मतदान केले असून, शर्मा यांचा जन्म 19 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.
भांडुपमध्ये 100 वर्षांच्या आजोबांनी केले मतदान; या वयातही उत्साह कायम
100 वर्षाच्या शर्मांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.
मतदानात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा; यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. शर्मा यांनी मतदान केल्यानंतर, देशाच्या विकासासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे, असे आवाहन मतदारांना केले.त्याचप्रमाणे तरुणांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे, तसेच त्यांनी घरातील वृद्धांना मतदानासाठी आणले पाहिजे, असे ते म्हणाले.