मुंबई -100 कोटी वसुली करण्याचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता मागवण्यात आली होती. मात्र जेजे रुग्णालयातील अहवाल आज मुंबई सत्र न्यायालयात आला नसल्याने त्यांच्या अर्जावर आज होणारी सुनावणी ( 100 crore recovery case hearing adjourned ) टळली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात खांदे दुखीवर शस्त्रक्रिया करण्याकरीता खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता परवानगी मागितली होती. मात्र आज जेजे रुग्णालयातील अहवाल आला नसल्यामुळे सुनावणी टाळण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे.
अनिल देशमुख यांच्या प्रकरणावर 9 मे रोजी सुनावणी - मागील सुनावणीदरम्यान अनिल देशमुख यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आले की, जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी सुविधा हा अपुऱ्या आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टाकडून परवानगी मागितली होती. जे जे रुग्णालयाकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असे कोर्टाने म्हटले होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टात आपल्या आजाराबद्दल स्वतः न्यायाधिशांनी माहिती दिली अनिल देशमुख यांनी खांदेदुखी असून उदय हदयविकाराची समस्या असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले. अनिल देशमुखच्या वतीने घरचे जेवण मिळावे म्हणून कोर्टाकडे अर्ज करण्यात आला आहे. यावर 9 मे रोजी सुनावणी होणार आहे.