मुंबई -कथीत 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआयने आज (सोमवारी) संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे या तिघांचा ताबा घेतल्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक केली. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयकडून या तिन्ही आरोपींची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली, मात्र न्यायालयाने 7 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या तिघांनाही 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी राहणार आहे.
सीबीआयकडून आज युक्तिवाद दरम्यान सांगण्यात आले, की या प्रकरणात चारशे कोटी रुपयांचे आतापर्यंत माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अनिल देशमुख असून इतर सहा आरोपी आहे. आता या प्रकरणात तपासाकरिता या चारही आरोपींची कोठडी आवश्यक आहे. मात्र अनिल देशमुख हे जे जे रुग्णालयात भरती असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. मात्र अनिल देशमुख यांच्या रुग्णालयातील भरती संदर्भात सीबीआयने सत्र न्यायालयामध्ये आज अनेक प्रश्न उपस्थित केले. 31 तारखेला कोठडी दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ऑर्थर रोड जेल प्रशासनाशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना सोमवारी ताबा देण्यात येणार, असे सांगण्यात आले होते. मात्र आज सकाळी अधिकारी गेले असता माहिती देण्यात आली, की शनिवारी त्यांना जे जे रुग्णालयात बाथरूममध्ये पडल्याने भरती करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात संशय निर्माण होत आहे. तसेच राज्य सरकार कुठलेही सहकार्य तपासात करत नसल्याचा युक्तिवाद देखील आज सीबीआयकडे राज मोहन चांद यांनी सीबीआय कोर्टात युक्तिवाद केला. तसेच आरोपींची 10 दिवस कोठडी घेण्यात यावी, अशी मागणी देखील केली सीबीआयने या सर्व आरोपींना दिल्लीत चौकशी करिता त्यांना नेण्याची परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने ही परवानगी फेटाळत मुंबईतच तपास करण्यात यावा, असे निर्देश दिले आहे.
अनिल देशमुख यांचा शंभर कोटी वसुली प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली सीबीआर टीमने आज ताबा मिळावा याकरिता फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. आता न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे आर्थर रोड जेलमध्ये, तर सचिन वाजे तळोजा जेलमध्ये आहे. आर्थर रोड जेल आणि तळोजा जेल अधीक्षक यांना आरोपींची कस्टडी सीबीआयला देण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होत्या.