मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरील वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) दिल्ली दक्षता पथकाने या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांची सुमारे १० तास चौकशी केली, असे एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले. चौकशी पूर्ण न झाल्याने आज त्याला पुन्हा बोलावले आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलची १० तास चौकशी
प्रभाकर साईल त्याच्या वकिलांच्या टीमसह दुपारी २ वाजता वांद्रे येथील सीआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचला. प्रभाकर साईलने समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याची एनसीबीने सुमारे १० तास चौकशी केली.
प्रभाकर साईल त्याच्या वकिलांच्या टीमसह दुपारी २ वाजता वांद्रे येथील सीआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचला. प्रभाकर साईलने समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याची एनसीबीने सुमारे १० तास चौकशी केली. एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. तसेच नवाब मलिक यांच्या आरोपांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आज पुन्हा एकदा प्रभाकर साईलला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.