महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

corona update : राज्यात 1 हजार 553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 26 रुग्णांचा मृत्यू - patients died corona

राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. 11 ऑक्टोबरला 1736 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात आणखी घट होऊन आज शनिवारी 16 ऑक्टोबरला 1553 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Oct 16, 2021, 8:00 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. 11 ऑक्टोबरला 1736 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात आणखी घट होऊन आज शनिवारी 16 ऑक्टोबरला 1553 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 26 मृत्यूंची नोंद झाली असून 1 हजार 682 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

हेही वाचा -नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल

29,627 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 1553 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 89 हजार 982 वर पोहोचला आहे. तर, आज 26 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 760 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 682 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 16 हजार 998 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 9 लाख 9 हजार 998 नमुन्यांपैकी 65 लाख 89 हजार 982 नमुने म्हणजेच, 10.82 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 34 हजार 807 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 29 हजार 627 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 75, 29 सप्टेंबरला 3187, 30 सप्टेंबरला 3063, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 319
नाशिक - 118
अहमदनगर - 230
पुणे - 172
पुणे पालिका - 92
पिंपरी - चिंचवड पालिका - 45
सोलापूर- 48
सातारा - 45
सांगली - 74

हेही वाचा -मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. प्रत्येक विकेन्डला सायन उड्डाणपूल राहणार बंद, एमएसआरडीसीचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details