मुंबई : मोफत शिक्षण अधिकार अधिनियमाअन्वये(आरटीई) प्रवेशला 3 मार्चपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. अवघ्या 13 दिवसांतच आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 1 लाख 36 हजार 661 अर्ज या अंतर्गत मिळाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात आरटीई प्रवेशासाठी 1 लाख 36 हजार अर्ज - rte
आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे.

3 मार्चपासून अर्ज सुरू
आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी पालकांना https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आरटीईला क्षमतेपेक्षा जास्त अर्ज
अवघ्या 13 दिवसांत आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून 9 हजार 431 शाळांमध्ये 96 हजार 801 एक जागा आहेत. मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत राज्यभरातून आरटीई प्रवेश यासाठी तब्बल 1 लाख 36 हजार 661 अर्ज आले आहे. आरटीईअंतर्गत असलेल्या जागांच्या तुलनेत अधिक अर्ज आल्याने आरटीई प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
पुण्यात सर्वाधिक अर्ज
आरटीई प्रवेशासाठी अर्जामध्ये पुण्यातून सर्वाधिक 36 हजार 714 अर्ज आले आहेत. त्या खालोखाल नागपूरमध्ये 16 हजार 946, ठाण्यात 11 हजार 533, नाशिकमध्ये 8 हजार 97 अर्ज आले आहेत. तर सर्वाधिक कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले आहेत. सिंधुदुर्गातून फक्त 91 अर्ज आले आहेत. त्यापेक्षा अधिक अर्ज नंदुरबारमधून 336, गडचिरोलीतून 327, हिंगोलीतून 430, रत्नागिरीतून 462 अर्ज आले आहेत.
मुंबईत तुफान प्रतिसाद
मुंबईतूनही 8 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाला मुंबईतून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मुंबईमध्ये 352 शाळांमध्ये 6 हजार 463 जागा आहेत. यामध्ये 290 शाळा एसएससी बोर्डाच्या आहेत. मुंबईमध्ये प्री-प्रायमरी वर्गाच्या 482 जागा आहेत. एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये 418 जागा आहेत. एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये 478 अन्न बोर्डाच्या शाळांमध्ये 64 जागा आहे, तर पहिलीच्या वर्गासाठी एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये 4 हजार 109 तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये 1हजार 172 अशा 5 हजार 981 जागा आहेत.