महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत शुक्रवारी 77 टक्के लसीकरण, एकूण 1 लाख 55 हजार 358 कर्मचाऱ्यांना लस - Mumbai corona vaccination drive latest news

मुंबईत शुक्रवारी 26 लसीकरण केंद्रांवर 103 बूथवर 3 हजार आरोग्य कर्मचारी तर 7, 300 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,300 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 77 टक्के म्हणजेच 7,920 जणांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहिम न्यूज
लसीकरण मोहिम न्यूज

By

Published : Feb 19, 2021, 9:54 PM IST

मुंबई - देशाबरोबरच मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरणाला सुरुवात झाली. शुक्रवारी 7,920 तर आतापर्यंत 1,55,358 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यामध्ये 1 लाख 53 आरोग्य कर्मचारी तर 55 हजार 305 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.



कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 16 जानेवारीला लसीकरणाची मोहिम स्थगित करण्यात आली होती. ही त्रुटी झाल्यानंतर 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली.

हेही वाचा-मुंंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच, आज 823 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत शुक्रवारी 26 लसीकरण केंद्रांवर 103 बूथवर 3 हजार आरोग्य कर्मचारी तर 7, 300 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,300 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 77 टक्के म्हणजेच 7,920 जणांना लस देण्यात आली. त्यातील 7 हजार 131 लाभार्थ्यांना पहिला तर 789 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 8 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आजपर्यंत 1,52,939 लाभार्थ्यांना पहिला तर 2419 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1,55,358 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा-अधिवेशनापूर्वी आमदारांनाही मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस? २५ तारखेला होणार निर्णय

कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आजपर्यंत कामा हॉस्पिटल 561, जसलोक हॉस्पिटल 63, एच एन रिलायंस 140, सैफी रुग्णालय 96, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल 60,
कस्तुरबा हॉस्पिटल 2488, नायर हॉस्पिटल 19687, जेजे हॉस्पिटल 1166, केईएम 18320, सायन हॉस्पिटल 8291, व्ही एन देसाई 2405, बिकेसी जंबो 15525, बांद्रा भाभा 6378, सेव्हन हिल हॉस्पिटल 10469, कूपर हॉस्पिटल 10809, गोरेगाव नेस्को 5930, एस के पाटील 2003, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 1153, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 15048, दहिसर जंबो 2241 असे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर भगवती हॉस्पिटल 1443, कुर्ला भाभा 1066, सॅनिटरी गोवंडी 2600, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 2064, राजावाडी हॉस्पिटल 15869, एल. एच. हिरानंदानी 10, वीर सावरकर 2057, मुलुंड जंबो 3880 अशा एकूण 1 लाख 52 हजार 939 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर दुसरा डोस म्हणून 2419 अशा एकूण 1 लाख 55 हजार 358 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details